
कणकवली : फोंडा येथील एका आलिशान रंगमंचावर सुरु आसलेल्या जुगार अड्ड्याचा 'कोकणसाद LIVE' ने पोलखोल केल्यानंतर त्या जुगार माफियांनी आता तो जुगार अड्डा दुसऱ्या ठिकाणी स्थलांतरित केलाय. आता या जुगाराची बैठक कणेरी रोड, हरकुळ जंगमवाडी येथील माळरानावरील एका काजू बागेत होत आहे. ही बैठक रात्री १० ते पहाटे ४ वाजेपर्यंत सुरु असते. अशी माहिती गोपनीय खबऱ्याकडून मिळाली आहे.
ही बैठक कणकवली पोलिस ठाण्याच्या आशीर्वादाने सुरु असल्याने याकडे पोलिस दुर्लक्ष करत आहे. दरम्यान, याबाबत पोलीस अधिक्षक अग्रवाल कठोर भूमिका घेणार का ? असा सवाल उपस्थित केला जात आहे.