बँकेची बत्ती गुल | ग्राहकांना मनस्ताप

Edited by: श्रीधर साळुंखे
Published on: September 04, 2023 15:28 PM
views 694  views

वैभववाडी : "इंडिया "त प्रसिद्ध असलेल्या बॅकेत बॅटरी बॅकअप नसल्याने यांचा परिणाम कामकाजावर होत आहे.वीज पुरवठा खंडित झाल्यावर बॅकेचे संपूर्ण कामकाज ठप्प होते.बॅकेच्या या गलथान कारभारामुळे ग्राहकांना मनस्ताप सहन करावा लागत.

देशभरात हजारो शाखा असणा-या तालुक्यातील एका बॅकेत गेल्या काही महिन्यांपासून विजेची समस्या जाणवत आहे.महावितरणचा वीज पुरवठा खंडित झाल्यावर या बॅकेत पर्यायी असणारी इन्व्हर्टर सुविधा नादुरुस्त झाली आहे.त्यामुळे ब-याचदा बॅकेचा वीजपुरवठा खंडित झाल्यावर संपूर्ण कामकाज ठप्प होते.यावेळी एकतर ग्राहकांना वीज पुरवठा सुरळीत होईपर्यंत ताटकळत बसावे लागते.

अन्यथा दुसऱ्या दिवशी पुन्हा  बॅकेत यावे लागते. तालुक्यात महत्वाची असलेल्या या बॅकेत ग्रामीण भागातील ग्राहकांची खाती आहेत.येथे व्यव-हासाठी वयोवृद्ध ग्राहक येतात,त्यांना बॅकेच्या या कारभारामुळे मनस्ताप सहन करावा लागतो.बॅकेने इन्व्हर्टर किंवा जनरेटरची सुविधा तात्काळ कार्यान्वित करावी.अन्यथा गणेश उत्सव काळात यामुळे वाद होण्याची शक्यता अधिक आहे.