किल्ले राजकोट येथील कामांची नेत्यांनी केली पाहणी

Edited by: कृष्णा ढोलम
Published on: November 25, 2023 19:18 PM
views 828  views

मालवण : किल्ले राजकोट येथे उभारणी होत असलेल्या छ्त्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा उभारणी तसेच परिसर सुशोभीकरण कामाची, तसेच तारकर्ली येथे ज्याठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी नौसेना दिनास उपस्थित राहणार आहेत त्या कामाची देखील पालकमंत्री रवींद्र चव्हाण, शिक्षणमंत्री दीपक केसरकर, माजी खासदार नीलेश राणे यांनी पाहणी केली.

दरम्यान, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता सर्वगोड यांनी याठिकाणी सुरू असलेल्या कामाची माहिती दिली. यावेळी सर्व कामे ही २८ ता पूर्ण होतील अशी माहिती पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी दिली. यावेळी जिल्हाधिकारी किशोर तावडे, भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, राजन तेली, दत्ता सामंत, अशोक सावंत, धोंडी चिंदरकर, विजय केनवडेकर, सुदेश आचरेकर, दीपक पाटकर, राजन वराडकर, महेश मांजरेकर, सौरभ ताम्हणकर, ललित चव्हाण, राकेश सावंत यासह अन्य उपस्थित होते.