राज्यातल्या पहिल्या कोलगाव ग्रामपंचायत मोबाईल अॅॅपचं लोकार्पण थोड्याचं वेळात

महेश सारंग यांचा पुढाकार
Edited by: विनायक गावस
Published on: April 19, 2023 17:27 PM
views 218  views

सावंतवाडी : महाराष्ट्रात सर्वप्रथम आपल्या दैनंदिन कामकाजासाठी मोबाईल अॅप तयार करणारी पहिली ग्रामपंचायत म्हणून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कोलगाव ग्रामपंचायतीने अवघ्या राज्याचे लक्ष वेधून घेतले आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या डिजिटल इंडिया या संकल्पनेतून हे अॅप तयार करण्यात आले आहे.

कोलगावचे सुपुत्र, भाजपचे युवा नेते तथा सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक महेश सारंग यांनी यासाठी पुढाकार घेतला आहे. सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते सावंतवाडी येथील गांधी चौकात कोलगाव ग्रामपंचायत मोबाईल अॅपचा लोकार्पण सोहळा थोड्याच वेळात पार पडणार आहे.

या राज्यातील पहिल्या मोबाईल अॅपच्या लोकार्पणासाठी  कोलगाव ग्रामपंचायतीचे सरपंच संतोष राऊळ, उपसरपंच दिनेश सारंग, ग्रामविकास अधिकारी संतोष जाधव तसेच सर्व सदस्य सज्ज झाले आहेत.