
सावंतवाडी : स्व. नामदार भाईसाहेब सावंत यांनी अत्यंत खडतर परिस्थितीतून मार्ग काढत जिल्हा परीषद अध्यक्ष ते कॅबिनेट मंत्र्यापर्यंतचा प्रवास केला. एक शेतकरी, शिक्षण प्रेमी, आदर्श शिक्षक, राजकारणी, समाजनेता या जीवनाच्या खडतर प्रवासातून संघर्ष करत त्यांनी आपलं कार्यकर्तृत्व सिद्ध केलं. राणी पार्वतीदेवी ज्युनिअर कॉलेजच्या शासकीय मान्यतेसाठी त्यांनी केलेली धडपड व दिलेलं योगदान बघता ते या प्रशालेच्या निमिर्तीचे शिल्पकार आहेत असे उद्गार शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव गुरूवर्य व्ही. बी. नाईक यांनी काढले. पुण्यतिथी निमित्त आयोजित अभिवादन कार्यक्रमात ते बोलत होते.
राणी पार्वतीदेवी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज सावंतवाडी येथे राजर्षी छत्रपती शाहू महाराज आणि स्वर्गीय नामदार भाईसाहेब सावंत यांच्या प्रतिमेला मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. सुरूवातीला कार्यक्रमाचे प्रस्ताविक रश्मी देऊस्कर यांनी केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष शिक्षण प्रसारक मंडळ सावंतवाडीचे सचिव गुरुवर्य व्ही.बी.नाईक यांनी राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या 151 व्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन करून त्यांनी कृषिक्षेत्रासाठी केलेल्या कार्याचे तसेच सामाजिक, शैक्षणिक, आरोग्य, उद्योग इत्यादी क्षेत्रात त्यांनी दिलेल्या भरीव योगदानाबद्दल ऋण व्यक्त केले. तसेच समाजाने त्यांच्या कार्यातून निश्चितच प्रेरणा घेतली पाहिजे असे सांगितले. त्याचबरोबर स्वर्गीय नामदार भाईसाहेब सावंत यांच्या पुण्यतिथी निमित्ताने त्यांच्या स्मृतींना उजाळा दिला. कॉलेजच्या उपप्राचार्य डॉ. सुमेधा नाईक यांनी राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त आणि स्वर्गीय नामदार भाईसाहेब सावंत यांच्या पुण्यतिथी निमित्त आदरांजली वाहून छत्रपती राजर्षी शाहू महाराज हे लोकराजा म्हणून त्यांनी केलेले कार्य आणि स्वर्गीय आमदार भाईसाहेब सावंत लोकनेते म्हणून केलेल्या कार्याचा आढावा घेतला. या दोन्ही महनीय व्यक्तींचे योगदान समाजासाठी दिशादर्शक ठरतील असे सांगितले. तसेच अदिती अवधूत राज्याध्यक्ष आणि श्रावणी सावंत या विद्यार्थिनींनी राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या प्रेरणादायी जीवनप्रवासाविषयी व कार्यकर्तृत्वाविषयी अभ्यासपूर्ण भाषण करत उपस्थितांची मने जिंकली. या कार्यक्रमासाठी कला शाखेतील सर्व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
तसेच सांस्कृतिक समिती प्रमुख प्रा.डॉ संजना ओटवणेकर, प्रसिद्धी कमिटी प्रमुख प्रा. संतोष पाथरवट, सांस्कृतिक कमिटी सदस्य प्रा. वामन ठाकूर, प्रा.जोसेफ डिसिल्वा, प्रा . महाश्वेता कुबल, प्रा. विनिता घोरपडे, प्रा. सविता माळगे, प्रा.डाॅ.अजेय कामत, प्रा.रणजीत राऊळ, प्रा.पवन वनवे, प्रा.दशरथ सांगळे, सर्व प्राध्यापक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. विठ्ठल नाईक यांनी केले तर आभार प्रा. महाश्वेता कुबल यांनी मानले.