
कणकवली:कणकवली सेवानिवृत्त केंद्रप्रमुख व जिल्हा ज्येष्ठ नागरिक सेवासंघाचे जिल्हाध्यक्ष रवींद्रनाथ अनंत मुसळे यांचे सोमवारी सकाळीच्या ८ सुमारास निधन झाले. त्यांच्या निधनाची बातमी कळताच मुसळे त्यांच्या कनकनगर येथील निवासस्थानी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी भेट देऊन कुटुंबीयांचे सांत्वन केले. उद्या सायंकाळी ४ वा त्यांची अंत्ययात्रा कनकनगर येथील त्यांच्या घरापासून ते कणकवली मराठा मंडळ नजीकच्या स्माशन भूमीपर्यंत काढण्यात येणार आहे. त्यानंतर त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती त्यांचा कुठुबीयांनी दिली.