ईडी सरकारचा आनंद शिधा पोहचलाच नाही

संदीप सरवणकर यांचा टोला
Edited by: प्रतिनिधी
Published on: October 24, 2022 20:36 PM
views 227  views

वैभववाडी:सर्वसामान्यांची दिवाळी गोड करण्यासाठी मोठा गाजावाजा करून राज्य सरकारने जाहीर केलेला आनंद शिधा गोरगरिबांच्या घरी पोहचलाच नाही.जनतेच्या कराच्या पैशातून भेट वाटण्याची सरकारने भिमगर्जना केली होती.

पण तीही अंधेरी निवडणुकीत बार फुसका निघाल्यामुऴे माघारी घेतली का? असा मिश्कील सवाल ,शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सिंधुदुर्ग जिल्हा कार्यकारणी सदस्य  संदिप सरवणकर यांनी  केला आहे.

     सिंधुदुर्ग जिल्ह्यात बहुतांश तालुक्यात हा शिधा पोहचला नाही. यावरून श्री सरवणकर यांनी सरकारवर टिकास्त्र सोडले आहे. ते म्हणाले,राज्याचे अन्न व नागरी पुरवठामंत्री  रविंद्र चव्हाण साहेब हे जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत.त्याच जिल्ह्यात अजून शिधा मिळाला नाही. पालकमंत्र्यांच्या मतदारसंघात दिवाळी पुर्वी याच वाटप होत तर सिंधुदुर्गात याच वाटप का केल गेले नाही. येथील जनता पालकमंत्र्यांचे मतदार नाही म्हणून शिधा वाटपात विलंब केला का?असा सवालही सरवणकर यांनी विचरला आहे.

   जिल्ह्यात सरकारचे स्थानिक लोकप्रतिनिधी हे अजुनही राजकिय शिमग्यात रमलेले आहेत. त्यांना लोकांची दिवाळी येवुन जात असताना त्याच काही देण घेण नाही. ते आपल्याच कार्यात रमले आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांना सरकारची ती घोषणा"पोकळ करंज्या " प्रमाणे झाली आहे अस वाटू लागले आहे. त्यांचा "अंदागोंधी शिधा"  हा त्यांचे अच्छे दिन प्रमाणे मृगजळ झाले आहे. त्यांनी दिलेल्या आश्वासनावर अवलंबुन राहून, दिवाळीचा  आस्वाद सोडता येणार नाही,हे ओळखुन

सर्वसामान्यांनी आपला दिवाळी बाजार केला आहे.शासनाच्या या पोकळ घोषणेला मध्यावधी निवडणुकीत 

जनतेने रिटर्न गिफ्ट देण्यासाठी तयारी केली आहे. अशी मिश्किल शब्दांत सरवणकर यांनी टिका केली आहे.