
देवगड : देवगड वाडा येथी बंद घराच्या मागील दरवाजा फोडून आत प्रवेश करून घरातील रोख रक्कम व दागिने चोरून नेल्याची घटना वाडा भटवाडी येथे दिनांक १६ मे ते ६ जून या कालावधी ही घटना घडली याबाबत पोलिसांन कडून मिळालेल्या अधिक माहिती च्या आधारे वाडा भटवाडी येथील वैशाली गोपीनाथ घाडी वय ५५ राहणार वाडा लायब्री समोर या १६ मे रोजी आपले घर बंद करून गोवा येथे गेल्या होत्या. त्या घराच्या बाहेर परिसराची देखभाल दीपक अंकुश जाधव हे पाहत होते.व तेही २९ मे रोजी मुंबईला गेले होते.त्या दरम्यान ते मुंबईहून परत आल्यानंतर ६ जून रोजी सकाळी ६:३० वाजता सुमारास ते त्या देखभाल करत असल्या घरी आल्यानंतर त्या घराच्या मागील दरवाजा फोडलेला त्यांना दिसला त्यांनी याबाबत वैशाली घाडी यांना फोनवरून कळविले व त्या ही गावी आल्या.
त्यावेळी त्यांच्या घराच्या मागील दरवाजा फोडून चोरट्याने आत प्रवेश करून रोख रक्कम दागिने चोरून नेल्याचे निदर्शनास आले.त्यामध्ये त्यांच्या 40,000/- रू च एक मंगळसूत्र मध्ये काळे मणी असलेले तसेच 25,000/- एक सोन्याची पट्टी मंगळसूत्र मध्ये काळे मणी असलेले सुमारे 2 तोळ्याचे तसेच 25000/- एक टिळक असलेली सोन्याची चैन सुमारे 2 तोळ्याची तसेच15000/- रू किमतीच्या पाच सोन्याच्या अंगठ्या तर 10000/- रू किंमतीचे सोन्याचे लोमते कानातले सुमारे 05 ग्रॅम व सुमारे एक ग्रॅम पट्टीची नथ असलेले तर 40000/- सुमारे चांदीचे 04 पैंजण चांदीचे एक ब्रेसलेट चांदीची एक कंबर साखळी असे एकूण सुमारे पाव किलो वजनाची चांदी तसेच 4,00,000/- पाचशे रुपयाच्या सुमारे 400 नोटा,100 रुपयाच्या १००० नोटा,200 रुपयांच्या 500 नोटा असे मिळून किंमत सुमारे 5,55,000/- असा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला आहे.
याबाबत पोलिसांना कळविल्यानंतर देवगड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अरुण देवकर पोलीस हेड कॉन्स्टेबल राजन जाधव आशिष कदम स्वप्निल ठोंबरे यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. तसेच कणकवली पोलीस उपविभागीय अधिकारी घनश्याम आढाव यांनीही चोरी झालेल्या ठिकाणी भेट देऊन माहिती घेतली. स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाच्या टीमने ही भेट देऊन तपासाला सुरुवात केली. याबाबत तक्रार देण्याची प्रक्रिया गुरुवारी रात्री उशिरापर्यंत देवगड पोलीस ठाण्यात सुरू होती.