
वैभववाडी : अर्जुन रावराणे प्रशालेच्या विद्यार्थिनींनी शहरात रस्त्यावर पडलेले पाकीट पोलीसांच्या ताब्यात दिले. त्यांच्या या प्रामाणिकपणाच सर्वत्र कौतुक होत आहे.
एडगाव घाडीवाडी येथील जागृती गणेश घाडी, आर्या संजय घाडी, समीक्षा सचिन घाडी या विद्यार्थिनीं शुक्रवारी नेहमी प्रमाणे सकाळी शाळेत येत होत्या. दरम्यान त्या सुखनदी पुलाजवळ आले असता त्या तिघींना रस्त्यावर एक पाकीट पडलेले आढळले. विद्यार्थ्यांनी हा प्रकार प्रकार आपल्या शिक्षकांना सांगितला. शाळेच्या शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी ते पाकीट वैभववाडी पोलिस ठाण्यात जमा केले.
पोलिसांनी विद्यार्थ्यांचा प्रामाणिकपणा आणि सजगतेचे मनःपूर्वक कौतुक केले. त्यातील आधारकार्ड,पॅनकार्ड एटीएम कार्ड व ओळखपत्रे आणि अन्य दस्तऐवज तपासून पोलीस संबंधित व्यक्तीशी संपर्क साधत आहेत.विद्यार्थीनींच्या प्रामाणिकपणाबद्दल गावातील नागरिक, पालक आणि शाळेचे मुख्याध्यापक यांनी त्यांचे अभिनंदन केले.










