
देवगड : जेव्हा जेंव्हा डॉं. बाबासाहेब आंबेडकर आणि गौतम बुध्दांच्या प्रति अभिवादन व्यक्त करण्यासाठी बौध्दबांदवाची रॅली निघेल तेंव्हा ती रॅली केवळ अभिवादन व्यक्त करण्यापुरती न रहाता आम्ही तुम्ही दिलेल्या समतेच्या मार्गावरून चालत असून यापुढेही चालत रहाणार असल्याची ग्वाही देणारी असली पाहीजे असे परखड मत प्रदिप कदम यांनी जामसंडे बौध्दवाडी येथे व्यक्त केले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६९ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्ताने जामसंडे येथील सम्यक प्रबोधिनी या मंडळाने डॉ. बाबासाहेबांना आदरांजली अर्पण करण्यासाठी अभिवादन सभेचे आयोजन केले होते. या निमित्ताने शैक्षणिक आणि सामाजिक चळवळीतील प्रदिप कदम यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. या सभेच संबोधीत करताना प्रदिप कदम यांनी अभिवादन रॅली बाबत काय उध्देश असावा याचे सखोल विवेचन केले. बौध्दबांदवानी अभिवादन रॅली काढताना डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या २२ प्रतिज्ञा आणि बौध्द धर्माची संहिता या मार्गावरूनच आम्ही चालत असून यापुढेही चालणार असे विचार करूनच सहभागी होण्याची काळाची गरज आहे. नाहीतर अलिकडच्या काळात बौध्दसमाजाची नवीन पिढी डॉ.बाबासाहेब यांच्या विचारधारेशी फारकत घेत अंधश्रध्दा पसरविणा-या प्रकारांना कवटाळत असल्याची खंत ही यावेळी त्यांनी व्यक्त केली. आजच्या घडीला पाच लोकसुध्दा डॉ.बाबासाहेब यांच्या मताचे नाहीत ही बाब सांगताना ज्येष्ठ कवी वामनदादा करडक यांच्या गीताची उपस्थितांना आठवण करून दिली. तसेच गौतम बुध्दांना विष्णूचा अवतार माननारे लोक आपल्या घरात बुध्दांना पुजतात का असा सवाल ही या निमित्ताने केला.
यावेळी मंडळाचे माजी अध्यक्ष एम. के.जामसंडेकर, मंडळाचे विद्यमान अध्यक्ष विलास जाधव आपले परखड विचार मांडले. मंडळाचे उपाध्यक्ष प्रकाश जाधव यांनी प्रमुख वक्त्यांचा परिचय करून दिला. यावेळी देवगड तालुका सेवा संघाचे सचिव सुनील जाधव, मंडळाचे अध्यक्ष विलास जाधव, उपाध्यक्ष प्रकाश जाधव, मनीषा जामसंडेकर, उपसचिव संदीप जाधव, सपना जाधव, कोषाध्यक्ष प्रकाश जाधव, माजी अध्यक्ष सोनाली जाधव, नितेश जाधव, माजी उपाध्यक्ष सुरेश जाधव आदीआजी-माजीपदाधिकाऱ्यांसह महिलावर्ग बाल बालिका सभासद युवक मोठ्या संख्येने सभागृहात उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी व रॅलीची सजावट करण्यासाठी मंडळाचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते व युवक यानी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिव राजेंद्र जाधव यांनी केले तर आभार प्रदर्शन मंडळाचे माजी सचिव पंकज जाधव यांनी केले.










