मालवणी एकांकिका स्पर्धेची शनिवारी रंगणार महाअंतिम फेरी

Edited by:
Published on: March 28, 2025 18:35 PM
views 435  views

मुंबई : 'आम्ही मालवणी"या दोन लाखाच्या वर सदस्य संख्या असलेल्या फेसबुक समूहांने   आयोजित केलेल्या मालवणी एकांकिका २०२५, स्पर्धेची महाअंतिम फेरी शनिवार दिनांक ५ एप्रिल २०२५ रोजी दुपारी ३ वाजल्यापासून मिरा रोड येथील भारतरत्न गानसम्राज्ञी लता मंगेशकर सभागृहात आयोजित केलेली आहे.

या महाअंतिम फेरीत, क्राऊड नाट्य संस्था डोंबिवली, मिरग",श्री स्वामी इव्हेंटस," ती ' चा अस्तित्व, " शिव रणभूमी प्रशांत प्रतिष्ठान," भू.भू, "श्री.गणेश कलामंच कणकवली, " काव काव" '' ,अमरहिंद मंडळ," रेशन कार्ड '', सृजन द क्रिएशन, " फ्रिडम अॅट मिडनाईट,"या सहा एकांकिका सादर होणार आहेत.

या महाअंतिम सोहळ्याला लेखक, दिग्दर्शक, हास्यजत्राकार सचीन गोस्वामी, कवी लेखक डॅा.महेश केळुस्कर, अभिनेते,पंढरीनाथ कांबळे, अभय खडपकर, अभिनेत्री माधवी जुवेकर या मान्यवरांची प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती असणार आहे.

मालवणी एकांकिका २०२५ ,पर्व २ रे च्या या  महाअंतिम सोहळ्याला बहुसंख्य मालवणी रसिक जनांनी हजर राहून या सोहळ्याची शोभा वाढवावी असे आवाहन "आम्ही मालवणी, " फेसबुक समूहाचे संचालक श्री.सतेज दळवी व एकांकिका कार्यवाह श्री.विठ्ठल सावंत, प्रदीप तोंडवळकर यांनी केले आहे.