शासनाने विद्यार्थ्यांना पूर्ण गणवेशच पुरवावेत

पुरोगामी शिक्षक संघटनेची मागणी
Edited by: लवू म्हाडेश्वर
Published on: June 15, 2024 13:43 PM
views 182  views

देवगड : शालेय विद्यार्थ्यांच्या मोफत गणवेश योजनेबाबत राज्यातील शिक्षक व पालकांच्या वतीने आलेल्या सुचनांचा विचार करून राज्यातील प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना पूर्ण गणवेशच मिळावा अथवा शीलाई अनूदान वाढवून मिळावे अशी मागणी महाराष्ट्र पुरोगामी प्राथमिक शिक्षक संघटनेचे राज्याध्यक्ष प्रसाद पाटील, राज्यसरचिटनिस हरीश ससनकर यांनी शासनाकडे निवेदनाद्वारे नुकतीच केली आली.

निवेदनात राज्यातील सर्व विदयार्थ्यांना मोफत गणवेश वितरीत करण्याच्या निर्णयाबद्दल शासनाचे मनस्वी अभिनंदन करण्यात आले. सर्व विदयार्थ्यांना भेदभाव विरहीत गणवेश मिळावा ही संघटनेची अनेक दिवसांची मागणी पुर्ण होत असल्याबद्दल व सोबतच सर्व विदयार्थ्यांना बुट पायमोजे सुद्धा मोफत वितरीत होत असल्याबद्दल संघटनेच्यावतीने शासनाचे आभार व्यक्त करण्यात येत आहे. मात्र सन 2024-25 मध्ये राज्यावरून सर्व विदयार्थ्यांना गणवेश कापड वाटपाचा निर्णय होत असल्याचे आदेश आहेत. त्यामुळे गणवेश शिलाई आता स्थानिक स्तरावरून करावी लागणार आहे. याबाबत राज्यातील शिक्षक व पालकांनी संघटनेकडे काही सुचना मांडल्या आहेत. त्या पुढील सूचनांचे निवेदन संघटनेने मंत्री शालेय शिक्षण व क्रिडा विभाग महाराष्ट्र राज्य, प्रधान सचिव शालेय शिक्षण व क्रिडा विभाग, शिक्षण आयुक्त शालेय शिक्षण विभाग महाराष्ट्र राज्य पुणे तसेच राज्य प्रकल्प समन्वयक तथा सहसंचालक (प्रशासन) महा.प्रा.शि.परिषद पुणे यांना ई-मेल द्वारे पाठविण्यात आले.

त्यात विद्यार्थ्यांना सत्रारंभी दोन्ही पूर्ण तयारच गणवेश शासनाकडून मिळावेत. एक राज्य एक गणवेश योजनेअंतर्गत राज्यस्तरावरून एका गणवेशासाठी कापड देण्याचे नियोजन आहे व स्थानिक स्तरावर शाळा समितीने गणवेश शिलाई करून दयावी असे दि. १८ ऑक्टोंबर २०२३ व ५ जून २०२४ च्या शासननिर्णयाने आदेशित करण्यात आले आहे. मात्र शिलाईसाठी दिलेली ११० रू. ही रक्कम अत्यंत कमी असल्याने स्थानिक बचत गट त्यामध्ये गणवेश शिलाई करून देण्यास तयार नाहीत करीता शासनाच्या वतीने फक्त गणवेश कापड न पुरवता रेडिमेड गणवेश पुरवठा करण्यात यावा अथवा शिलाईसाठी रक्कम वाढवून देण्यात यावी अशी मागणी राज्य नेते विजय भोगेकर, राज्याध्यक्ष प्रसाद पाटील, राज्य सरचिटणीस हरीश ससनकर, राज्य कार्याध्यक्ष प्रकाश पाध्ये, राज्य कोषाध्यक्ष जी.एस.मंगनाळे,राज्य महिला पदाधिकारी डॉ.अल्काताई ठाकरे, शारदा वाडकर यांनी निवेदनातून केली आहे .अशी माहिती महाराष्ट्र पुरोगामी प्राथमिक शिक्षक समिती संघटना सिंधुदुर्ग जिल्हा नेते अशोक जाधव,जिल्हाध्यक्ष सचिन जाधव,जिल्हा सरचिटणीस प्रकाश वाडकर यांनी प्रसार माध्यमांना दिली आहे .