यशस्वी भव ! ; शासनानं केल नाही, अर्चना घारेंनी करून दाखवलं

सावंतवाडी मतदारसंघात १० वीच्या विद्यार्थ्यांसाठी अनोखा उपक्रम
Edited by: दिपेश परब
Published on: March 02, 2023 12:34 PM
views 327  views

वेंगुर्ला : १० वी SSC बोर्डाच्या परीक्षा आजपासून सुरू झाल्या आहेत. परिक्षा केंद्रापासून दुर अंतरावर असलेल्या खेड्यापाड्यातील विद्यार्थांना वेळेत पोहचण्यासाठी धावपळ करावी लागते. काहीवेळा एसटी, गाडी न मिळाल्यास तारांबळ उडते. हे रोखण्यासाठी राष्ट्रवादीच्या कॉंग्रेस पार्टीच्या कोकण विभाग महिला अध्यक्षा अर्चना घारे परब यांनी अनोखा उपक्रम हाती घेतला आहे. परिक्षार्थी  विद्यार्थ्यांसाठी गावागावात वाहनाची व्यवस्था करून त्यांना परिक्षा केंद्रावर वेळेत पोहचण्यासाठीची सोय उपलब्ध करून दिली. शेवटच्या पेपर पर्यंत ही सेवा दिली जाणार असून आज स्वतः अर्चना घारेंनी परिक्षा केंद्रावर जात विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्यात. 


माध्यमिक शालांत परीक्षा २०२३-१० वी बोर्डाच्या परीक्षा आजपासून सुरू झाल्या. परिक्षा केंद्रापासून दुर अंतरावर असलेल्या खेड्यापाड्यातील विद्यार्थांना वेळेत पोहचण्यासाठी धावपळ करावी लागते. काहीवेळा एसटी, गाडी न मिळाल्यास तारांबळ उडते. हे रोखण्यासाठी राष्ट्रवादीच्या कॉंग्रेस पार्टीच्या कोकण विभाग महिला अध्यक्षा अर्चना घारे परब यांनी अनोखा उपक्रम हाती घेतला आहे. सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील सावंतवाडी, वेंगुर्ला, दोडामार्ग तालुक्यातील परिक्षार्थी  विद्यार्थ्यांसाठी गावागावात वाहनाची व्यवस्था करून त्यांना परिक्षा केंद्रावर वेळेत पोहचण्यासाठीची सोय उपलब्ध करून दिली.


 वेंगुर्ला तालुक्यातील मातोंड हायस्कूलच्या विद्यार्थ्यांना वेंगुर्ला शहरात असलेल्या परीक्षा केंद्रावर वेळेत पोचता यावे यासाठी राष्ट्रवादीच्या नेत्या तथा अर्चना घारे फाउंडेशनच्या अर्चना घारे- परब यांनी विद्यार्थ्यांसाठी वाहनाची व्यवस्था केली आहे. परीक्षा संपेपर्यंत या वाहनातून विद्यार्थी परीक्षेला जाणार आहेत. याप्रसंगी अर्चना घारे- परब यांनी मातोंड येथे उपस्थित राहत विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी विद्यार्थी, पालक, शिक्षक, राष्ट्रवादीचे योगेश कुबल, गोपी बागायतकर, कर्मचारी रूपक मातोंडकर आदी उपस्थित होते. याबाबत विद्यार्थ्यांनी अर्चना घारे- परब यांचे आभार मानले.


दरम्यान, सावंतवाडी व दोडामार्ग तालुक्यात देखील असाच उपक्रम राबविला. सावंतवाडी दाणोली येथील विद्यार्थांना आंबोली परिक्षा केंद्रावर वेळेत पोहचण्यासाठीची ही सोय उपलब्ध करून देण्यात आली. यावेळी तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी, शहराध्यक्ष देवेंद्र टेमकर आदि उपस्थित होते. तिन्ही तालुक्यातील खेड्यापाड्यातील विद्यार्थासाठी ही व्यवस्था अर्चना घारेंनी केली असून या उपक्रमाच सर्वत्र कौतुक होत आहे.