
सावंतवाडी : महाविकास आघाडीमध्ये लोकसभा निवडणुकी प्रमाणे विधानसभेला देखील जो कोणी उमेदवार असेल त्याचा प्रचार करून त्याला प्रामाणिकपणे निवडून आणणार आहे. आमचं ध्येय्य फक्त भाजप व शिंदे गटाचा पराभव करण्याच आहे असे विधान महाविकास आघाडीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी केले. सावंतवाडी येथील पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
दरम्यान, सत्ताधारी पक्षातील भाजप दीपक केसरकर यांच्या अपयशाच्या नावाने ओरड मारत आहेत. परंतु, हे करताना भाजप देखील केसरकरांसोबत सत्तेत आहे याचा विसर त्यांना पडला असल्याचा खोचक टोला यावेळी महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी हाणला. भाजप व दीपक केसरकर यांच्यावर त्यांनी टिका केली. यावेळी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे विधानसभा प्रमुख रूपेश राऊळ, राष्ट्रवादी (श.प.)तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी, कॉग्रेस तालुकाध्यक्ष महेंद्र सांगेलकर, शिवसेना संघटक मायकल डिसोझा, शहराध्यक्ष अँड. राघवेंद्र नार्वेकर, देवा टेमकर, काशिनाथ दुभाषी आदी उपस्थित होते.