वरिष्ठांच्या आदेशानंतरही कारवाई नाही ; ग्रामसेवकाविरूद्ध घोगळे कुटुंब करणार आमरण उपोषण

Edited by: विनायक गावस
Published on: July 29, 2023 13:32 PM
views 330  views

दोडामार्ग : पिकुळे दोडामार्ग येथील मुख्य रस्ता ते बाबाचे टेंब पर्यंत जाणाऱ्या ग्रामपंचायत पिकुळेच्या अखत्यारीत असलेल्या रस्त्यावर काही लोकांनी अतिक्रमण करून रस्ता बंद केलेला आहे. याबाबत जिल्हाधिकारी, तहसिलदार, गटविकास अधिकारी दोडामार्ग यांना उचित कार्यवाही करून पोलिस बंदोबस्तात रस्ता खुला करण्याचे लेखी आदेश देवून सुद्धा ग्रामसेवक ग्रामपंचायत पिकुळे दोडामार्ग यांनी आजपर्यंत संबंधित कार्यवाही आदेशाबाबत कोणत्याही प्रकारची कारवाई केलेली नाही. 

 ग्रामपंचायत पिकुळे ग्रामसेवकांना कार्यालयामध्ये जावून वारंवार भेट घेतली असता उडवाउडवीची उत्तरे दिली. ग्रामसेवक जाणूनबुजून टाळाटाळ करत असल्यामुळे मी व माझे कुटुंब येत्या १५ ऑगस्ट २०१३ रोजी पासून पंचायत समिती कार्यालया दोडामार्ग येथे आमरण उपोषणास बसणार आहोत. उपोषणावेळी माझा व माझ्या कुटुंबियांच्या जीवीतास आरोग्यास कोणत्या प्रकारचा धोका निर्माण झाल्यास याला सर्वस्वी जबाबदार ग्रामसेवक राहतील इशारा भरत घोगळे यांनी दिला आहे.