
वैभववाडी : वैभववाडी तालुका शिक्षण संस्थेच्या अर्जुन रावराणे विद्यालय, कै.हेमंत केशव रावराणे कनिष्ठ महाविद्यालय व जयेंद्र दत्ताराम रावराणे सेमी इंग्लिश स्कूल या शिक्षण संकुलाचा वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रम २७ डिसेंबरला रात्री ८ वा. विद्यालयाच्या पटांगणावर आयोजित करण्यात आला आहे. यावेळी विद्यार्थ्यांचा विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम व बक्षीस वितरण आदी कार्यक्रम होणार आहेत.
या कार्यक्रमाला संस्थेचे सर्व पदाधिकारी व सदस्य उपस्थित राहणार आहेत. तालुक्यातील शिक्षण प्रेमींनी या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन मुख्याध्यापक भास्कर नादकर यांनी केले आहे.