न्हावेली माऊली मंदिरातील फंडपेटी अज्ञात चोरट्याने फोडली.

Edited by: विनायक गावस
Published on: October 04, 2023 15:50 PM
views 266  views

सावंतवाडी : तालुक्यातील न्हावेली येथील श्री देवी माऊली मंदिरातील फंडपेटी अज्ञात चोरट्याने फोडली. मध्यरात्रीच्या दरम्यान ही चोरीची घटना घडल्याचा संशय आहे.घटनास्थळी टिकाव आढळून आल्याने अज्ञात चोरटा स्थानिकच असण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे दरम्यान शेजारी सोनुर्ली गावातील मंदिरातही काही महिन्यापूर्वी चोरीची घटना घडली होती. अज्ञात चोरट्याने किमती ऐवज लंपास केला होता. या चोरीच्या तपास कामात अद्यापही पोलिसांना यश आले नाही. 

न्हावेली येथील मंदिरातील फंडपेटी चोरीच्या घटनेमुळे पोलिसांसमोर पुन्हा एकदा आवाहन निर्माण झाले आहे.चोरीच्या घटनेची माहिती पश्चिम महाराष्ट्र देवस्थान उपसमितीच्या पदाधिकाऱ्यांनी सातार्डा पोलीस दुरक्षेत्रात दिली आहे. श्वानपथक पाचारण करुन अज्ञात चोरट्यांचा तात्काळ शोध घ्यावा अशी मागणी ग्रामस्थांनी केली पुढील तपास सातार्डा पोलिस हवालदार एस.एन.टाकेकर करीत आहे यावेळी सरपंच अष्टविनायक धाऊसकर उपसरपंच संतोष नाईक आनंद नाईक आत्माराम नाईक गितेश नाईक आदी घटनास्थळी दाखल झाले .