
सावंतवाडी : सावंतवाडी तालुका खरेदी-विक्री संघाच्या निवडणुकीतील भारतीय जनता पार्टी व बाळासाहेबांची शिवसेना युतीच्या ''श्री देव पाटेकर सहकार परिवर्तन पॅनल''च्या प्रचाराचा शुभारंभ श्री देव पाटेकर चरणी नतमस्तक होत, भाजप युवा नेते आमदार नितेश राणे यांच्या उपस्थितीत करण्यात आला. याप्रसंगी पहिली युती ही कोकणात झाली अन् पहिला 'गुलाल' देखील कोकणातून उधळणार असा विश्वास नितेश राणे यांनी यावेळी व्यक्त केला. याप्रसंगी युवराज लखमराजे भोंसले, जिल्हा बँक अध्यक्ष मनिष दळवी, भाजप नेते महेश सारंग, बाळासाहेबांच्या शिवसेनेचे अशोक दळवी, भाजप जिल्हा प्रवक्ते संजू परब आदींसह युतीचे उमेदवार, पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सुरुवातीला भारतीय जनता पार्टी व बाळासाहेबांची शिवसेना युतीच्या प्रचाराचा शुभारंभ संस्थाकालीन श्री देव पाटेकर चरणी नतमस्तक होत करण्यात आला. यावेळी नितेश राणे यांनी १२ नोव्हेबर रोजी होत असलेल्या खरेदी विक्री संघाच्या निवडणूकीत युतीच्या पॅनलचे सर्व उमेदवार निवडून येवूदेत अशी देव पाटेकर चरणी प्रार्थना केली.
पत्रकार परिषदेत बोलताना ते म्हणाले, भाजप अन् बाळासाहेबांची शिवसेना यांच्या युतीच्या श्री देव पाटेकर सहकार परिवर्तन पॅनलच चिन्ह हे छत्री आहे. ही विकासाची छत्री असून ती शेतकऱ्यांचा विकास करेल, त्यांना समृद्धीकडे घेऊन जाईल असा विश्वास व्यक्त केला. तर पहिली युती ही कोकणात झाली, 'गुलाल' देखील कोकणातून उधळणार असा विश्वास व्यक्त करत भाजप, बाळासाहेबांची शिवसेना यांची रणनीती विजयाची आहे. कॉग्रेस, राष्ट्रवादी, ठाकरे शिवसेनेच्या तीन माकडांना मतदान करून फायदा होणार नाही, हे मतदारांना ठावूक आहे. त्यामुळे आमचा विजय निश्चित आहे असे राणे म्हणाले.
यावेळी भाजपा नेते युवराज लखमराजे भोंसले, जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, जिल्हा बँकेचे संचालक पॅनल प्रमुख महेश सारंग, भाजपा जिल्हा प्रवक्ते तथा माजी नगराध्यक्ष संजू परब, बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे पॅनल प्रमुख अशोक दळवी, जिल्हा बँक संचालक गजानन गावडे, रवींद्र मडगावकर, गुरुनाथ पेडणेकर, प्रमोद कामत, सावंतवाडी शहर मंडल अध्यक्ष अजय गोंदावळे, महिला अध्यक्षा मोहिनी मडगांवकर, बांदा मंडल अध्यक्ष महेश धुरी, दोडामार्ग मंडल अध्यक्ष सुधीर दळवी, एकनाथ नाडकर्णी, प्रकाश गवस, संतोष नानचे, ठाकुर, पॅनलचे उमेदवार दत्ताराम कोळंबेकर, प्रवीण देसाई, आत्माराम गावडे, दत्ताराम हरमलकर, प्रभाकर राऊळ, रघुनाथ रेडकर, प्रमोद सावंत, प्रमोद गावडे, सोनू गावडे, ज्ञानेश परब, राघोबा राऊळ, आनारोजीन लोबो, रश्मी निर्गुण, सोनू जाधव, नारायण हिराप, अँड. निता सावंत, बबन राणे, विनोद राऊळ, अँड. परिमल नाईक, सुधीर आडिवरेकर, उदय नाईक, मनोज नाईक, आनंद नेवगी, अक्रम खान, मकरंद तोरसकर, संतोष राऊळ, दिनेश सारंग, दिलीप भालेकर, रेश्मा सावंत, चंद्रकांत जाधव, दादू कविटकर, सुरेंद्र बांदेकर, संतोष गांवस, बंटी पुरोहित, अजय सावंत, संदीप हळदणकर, केतन आजगावकर, गोविंद प्रभू आदींसह भाजपा व बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.