भय इथले संपत नाही...?

तिलारी खोऱ्यात टस्कर हत्तींचां मुक्त संचार शेती बागायतींचा फडशा आणि नागरिकांच्या काळजात भरतेय धडकी
Edited by:
Published on: March 22, 2024 06:17 AM
views 204  views

दोडामार्ग : तिलारी खोऱ्यात वन्य हत्तींचा वाढता उपद्रव येथे वास्तव्य करणाऱ्या नागरिकांच्या काळजात धडकी भरवत आहे. शेती बागायतीत नुकसान करणारे हे गजराज पिल्लासह आता थेट लोक वस्तीत सुद्धा दाखल होऊ लागल्याने, नव्हे तर नागरिकांनी पिण्यासाठी ठेवलेल्या पाणी सुद्धा गजराज पिऊन आपली तहान भागवू लागल्याने नागरिकाना आता घराबाहेर पडणेही धोक्याचे वाटू लागले आहे. ही धोक्याची घंटा वाजू लागल्याने येत्या काळात कुठचा अनुचित प्रकार घडू नये, यासाठी येथील नागरीक देवतांना साकडे घालत आहेत. 

तिलारी खोऱ्यातील हे, घाटीवडे बांबर्डे, सोनावल, पाळये, केर, मोर्ले आदी गावांमध्ये हत्तीच्या कळपाने अक्षरशः थैमान घातले आहे. शेतीच्या नुकसानी बरोबरच थेट ते आता फणस आणि पिण्याच्या पाण्यासाठी  शिरकाव करू लागल्याचे चित्र पुढे आले आहेत. हेवाळे येथे तर घरा शेजारी येऊन टस्कर हत्ती व पिल्लाने  भांड्यात भरून ठेवलेले पाणी पिले. प्लास्टिक ड्रम मधील पाणी पितानाचे हत्तीचे छायाचित्र आणि व्हिडिओ ही यावेळी ग्रामस्थानी लपून छपून मोबाईल मध्ये टिपला. मात्र दिवसेंदिवस हत्तींची वाढलेली दहशत आजी भर वस्तीत दिवसा ढवळ्या वावर होऊ लागल्याने ग्रामस्थांची पचाधारण बसली आहे. गावो गावी नागरिक भीतीने दिवस काढत आहेत.

शिवाय तिलारी खोऱ्यात बागायतींच्या नुकसानीचे सत्र सुरूच आहे. आता फणसांचा सीजन असल्याने हत्ती थेट लोकवस्तीत घुसत असल्याचे प्रकार वाढले आहेत. या भयाण प्रकरांमुळे लोकांचे फिरणे सुद्धा मुश्कील झाले आहे. सोमवारी तर चक्क करून टाकणारा एक प्रकार हेवाळे गावात घडला. एक टस्कर पिल्लूसह दुपारच्या वेळेत थेट घराच्या अंगणातच आला. त्याला पाहून घरातल्या लोकांचा व ग्रामस्थांचा थरकाप उडाला. कदाचित तो हत्ती ताहानेने व्यकुल झालेला असावा. मागच्या अंगणात पाण्यांने भरलेले एक प्लास्टिक बॅरल होते. हत्तीने बॅरल मधील पाण्यावर आपली तहान क्षमविली. हत्ती पाणी पीत असल्याची खबर ग्रामस्थांना मिळताच गाजावाजा न करता ग्रामस्थ एकवटले. त्याला घरा पासून व वस्थिपासून दूर हाकलवण्यासाठी ग्रामस्थानी वेगवेगळी शक्कल लढवून मोठया शिताफीने हत्ती व पिल्ला ला जंगलाच्या दिशेने पिटाळले. सुदैवाने तो हत्ती कोणतीही हानी न करता जंगलात गेल्याने सगळ्यांनीच सुटकेचा निःश्वास टाकला. मात्र या प्रकाराची आणि व्हिडिओची मोठी चर्चा आता तालुका भर सुरू झाली आहे. यावर वेळीच तोडगा न काढल्यास हे चित्र भविष्यात अधिक धोकादायक असू शकते अशी भीती व्यक्त केली जात आहे.

हेवाळे, घाटीवडे, बांबर्डे, सोनावल, केर, मोर्ले, पाळये आदी ठिकाणच्या पंचक्रोशीत हत्तींचा वावर सुरू आहे. सातत्याने ते आलटून पालटून प्रत्यके गावागावात नुकसान करत आहेत. एकूण या परिसरात सहा हत्ती सध्या वास्तव्य असल्याचे समजेते  आहे. यात दोन टस्कर, एक मादी व तीन पिल्लू, ( ही तिन पिल्ले आता पिल्लू राहिली नसून ती मोठी झाली आहेत.) त्या तीन पिल्लात एक मादी पिल्लूही आहे. हे सहाही हत्ती एकत्र कळपात नसून विखुरलेले आहेत. अशी माहिती स्थानिकांकडून मिळत आहे.  

दरम्यान मोर्ले व हेवाळे येथे दोन टस्कर हत्तींचे वास्तव्य आहे. यापैकी एका कडे पिल्लू आहे. दोनच दिवसात या पिल्लावर ताबा मिळविण्यासाठी बांबर्डे परिसरात त्या दोन्ही टस्कर मध्ये मोठे घमासान झाले. अखेर मोर्ले येथे असलेल्या टस्करने हेवाळे येथील टस्कर सोबत असलेल्या पिल्लावर ताबा मिळवला आहे. मात्र या घमासानात त्यावेळी दोन्ही टस्कर मध्ये झालेली झटापट, आणि एकमेंकावर चित्करणे सारे काही भयावह होते. त्यातच गेल्याच आठवड्यात मोर्ले येथे काजू बागेत जाणाऱ्या एका शेतकऱ्याच्या अंगावरही टस्कर हत्तीन चाल केली होती. आता काजुंचा सीजन असूनही हत्तींच्या वावराने आणि टस्करच्या दहशतीने महीला वर्गाला तर घरातून बाहेर पडणेही अवघड बनले आहे.