भोसले नॉलेज सिटीमध्ये सरस्वती पूजनाचा उत्साह

Edited by: विनायक गांवस
Published on: September 30, 2025 16:01 PM
views 105  views

सावंतवाडी : भोसले नॉलेज सिटी येथे आज सरस्वती पूजन मोठ्या उत्साहात व मंगलमय वातावरणात संपन्न झाले. प्रतिवर्षाप्रमाणे यावर्षीदेखील देवी शारदेच्या मूर्तीवर अभिषेक करून विधिवत पूजा करण्यात आली.

या पूजनाचे यजमानपद संस्थेचे कार्याध्यक्ष अच्युत सावंतभोसले व अस्मिता अच्युत सावंतभोसले यांनी भूषविले. या प्रसंगी संस्थेचे संचालक मंडळ, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी तसेच मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते. पूजेनंतर परिसरात भक्तिपूर्ण वातावरण निर्माण झाले असून सर्वांनी देवी सरस्वतीच्या चरणी शैक्षणिक यश व प्रगतीसाठी प्रार्थना केली.