
दोडामार्ग : दोडामार्गात हत्ती थेट लोकवस्तीत घुसू लागलेत. खाद्याच्या शोधात हत्तीनीही आपला मोर्चा वस्तींकडे वळवलाय. कोकण म्हटले की येथील मेवा प्रसिद्ध आहे. रसाळ कापे गरे, आंबे, काजू, जांभूळ, करवंद, प्रसिद्ध आहे. दोडामार्ग तालुक्यात हत्ती बाधित गावात जंगली हत्ती कळपाला फणसाची चटक लागली आहे. आणि हे फणस मिळवण्यासाठी मोर्ले गावात लोकवस्ती मध्ये चक्क पुढच्या पायाने फणसाच्या झाडावर उभे राहून सोंडने फणस खाली पाडले. टस्कर हत्तीने अखेर खाद्य मिळवले. अनेकांनी या हत्तीला मोबाईल मध्ये कैद केले.
दोडामार्ग तालुक्यातील तिलारी खोऱ्यातील अनेक गावात जंगली हत्ती कळपाकडुन मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे. शेकडो बागायती उध्वस्त केल्या . जंगलात पडणारे वणवे यामुळे वन्य प्राणी यांना मिळणारे खाद्य बंद झाले. जंगली हत्ती हा मोठा प्राणी त्याला खाद्य भरपूर लागते यामुळे त्यांनी आपला मोर्चा शेती बागायती कडे वळवून अतोनात नुकसान केले.
लोकवस्ती मध्ये जंगली हत्ती आल्याने त्यांना फणसाची चटक लागली. फणसाच्या झाडावर कळप तुटून पडतो. अनेक गावात फणस हत्तींनी फस्त केले. मोर्ले गावात आजही काही झाडावर फणस आहे. या फणसावर चक्क टस्कर हत्तींची नजर पडली आणि ते फणस मिळवण्यासाठी टस्कर हत्तीने आपले पुढचे दोन्ही पाय फणसाच्या झाडावर ठेवून उभा राहुन सोंड जाईल तिथपर्यंत पोहचवून फणसावर ताव मारला . ही छबी अनेक शेतकरी युवकांनी मोबाईल मध्ये टिपली. पोटाची खळगी भरण्यासाठी काय पण हेच यातून दिसून येते.