
दोडामार्ग : दोडामार्ग तालुक्यात हैदोस घालणारे वन्य हत्ती अखेर सावंतवाडी तालुक्यात पोहचले. भिकेकोनाळ, कळणे मार्गे ओंकार हत्ती डोंगरपाल, डिंगणे गावात शुक्रवारी रात्री पोहचला आहे. त्यामुळे आज शनिवारी वनविभागा मार्फत डोंगरपाल व डिंगणे गावात नागरिकांना स्पीकर द्वारे सूचित करण्यात आले आहे. त्यामुळे डोंगरपाल, डिंगणे गावातील शेतकरी, ग्रामस्थ भयभीत झाले आहे.
मोर्ले गावांत शेतकऱ्याचा बळी घेतलेला ओंकार नामक हत्ती आता कळणे मार्गे सावंतवाडी तालुक्यातील डोंगरपाल डिंगणे गावात पोहचल्याने येथील नागरिकांत भीतीचे वातावरण निर्मणा झाले आहे. शुक्रवारी हा हत्ती दोडामार्ग येथील कुंब्रल, भिकेकोनाळ, कळणे गावात होता. तो मध्यरात्री कळणे मार्गे डोंगरपाल व डिंगणे गावात पोहचला आहे. हत्ती याठीकाणी पोहचल्यामुळे डोंगरपाल गावात वनवीभागा मार्फत सतर्कतेचा इशारा दिला आहे.










