
दोडामार्ग : मोर्ले येथे एका शेतकऱ्यावर हत्तीने पाठलाग करत हल्ला केल्याची घटना शुक्रवारी उशिरा सायंकाळी घडली. या घटनेने स्थानिक ग्रामस्थ होत गावात आलेल्या वनविभागाच्या कर्मचाऱ्यांची गाडी अडवून ठेवली व जोपर्यंत वरीष्ठ अधिकारी गावात येत नाही तोपर्यंत येथून कर्मचाऱ्यांना माघारी सोडणार नाही असा इशाराच दिला.
मोर्लेत येथे दिवसा ढवळ्या हत्ती वावरत असून शेती बागायतीत काम करणाऱ्या शेतकऱ्यांना कामाला शेतात जाणे जोखमीचे झालेले आहे. शुक्रवारी आपल्या काजू बागेत काम करत असताना शेतकरी नामदेव सुतार यांच्यावर हत्तीने हल्ला केला. यावेळी त्यांच्यासोबत त्यांची पत्नी व मुलगा काम करत होता. सुदैवाने नामदेव सुतार व कुटुंबीय या हल्यातून वाचले. ही घटना वनविभागाला कळविल्यानंतर कर्मचारी दाखल झाले यावेळी वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी हत्तीचे लोकेशन चुकीच दाखविल्याने हा प्रकार घडला असा आरोप स्थानिकांनी केला.
यावेळी उपसरपंच संतोष मोर्ये, माजी उपसरपंच पंकज गवस, माजी उपसरपंच नामदेव सुतार व स्थानिक शेतकरी, ग्रामस्थ उपस्थित होते.