राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या प्रयत्नांना अखेर यश !

Edited by:
Published on: October 15, 2023 14:16 PM
views 168  views

सावंतवाडी : उपजिल्हा रुग्णालय सावंतवाडीला औषध पुरवठा करण्यात आला आहे. राष्ट्रवादीचे पदाधिकारी व कार्यकर्ते विशेष करून राजू धारपवार यांनी रुग्णालयातील अनेक समस्या व औषध पुरवठा याकडे लक्ष वेधले होते. सातत्याने पाठपुरावा करत होते. त्यानुसार आज रुग्णालयाला औषध पुरवठा करण्यात आला आहे अशी माहिती राजू धार पवार यांनी दिली.

यासाठी रुग्णालयातील अधिकारी व कर्मचारी यांनी राष्ट्रवादीचे कार्यकर्ते व पदाधिकारी यांचे आभार मानले आहेत. यासाठी जिल्हाध्यक्ष अबीद नाईक, कार्याध्यक्ष काका कुडाळकर राजू धार पवार, उदय भोसले असलम खतीब रोहन पवार अशोक पवार गुरुनाथ कामत यांनी विशेष प्रयत्न केले.