डंपर गेला चोरीला..!

Edited by: उमेश बुचडे
Published on: August 26, 2023 19:40 PM
views 554  views

कणकवली : मुंबई गोवा महामार्गावरील कणकवली येथील उबाळे मेडिकल समोरील उड्डाण पुलाखाली लावलेला गंधार सदानंद बाणे यांच्या मालकीचा डंपर (क्र - एम.एच.सी -०७ -६३०८)  असून रात्री चोरीस गेला आहे. भर कणकवली शहरातून हा डंपर चोरी करत चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे.

कणकवली येथील उड्डाणपुलाखाली मोठ्या प्रमाणात वाहन पार्किंग केले जात असून चोरट्याने ही संधी साधत काल रात्री 11.08 वाजता गंधार सदानंद बाणे यांच्या मालकीचा डंपर (क्र - एम.एच.सी -०७ -६३०८) हा चोरून नेला. यावेळी चोरट्याने अन्य काही डंपरच्या काचा फोडल्या मात्र हा डंपर चावीच्या साह्याने सुरू झाल्याने डंपर घेत चोरट्याने पलायन केले. चोरीच्या अनुषंगाने पोलिसांनी  सीसीटीव्ही यंत्रणा तपासात चोरट्याचा शोध घेण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. याबाबत तपास पोलीस अधिकारी श्री.गाडेकर करीत आहेत.

 सदर डंपरच्या समोरील बाजूस सफेद कलर असून मागील हौदा भगव्या कलर असलेला आहे. त्या डंपरच्या काचेवर श्री. गांगोभैरी, ब्राह्मणदेव प्रसन्न, नमो भालचंद्राय, दत्तकृपा असे रेडियमने लिहिलेले आहे. याबाबत कणकवली पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली आहे. जर हा डंपर कोणाला दिसला असेल तर त्यांनी मालक  बाणे मो. ९४२३३००४९६  किंवा कणकवली पोलीस ठाण्यात यांना तातडीने संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.