
सावंतवाडी : महाराष्ट्र राज्य विद्युत कंपनी मर्यादित शाखा सावंतवाडी उप विभाग आयोजित सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघ आणि सावंतवाडी तालुका व्यापारी, उद्योजक व व्यावसायिक यांच्या सहकार्यानं शेतकरी, औद्योगिक, व्यावसायिक व घरगुती वीज ग्राहक मेळावा सावंतवाडी इथं आयोजित करण्यात आला आहे. यावेळी उपस्थित वीज वितरण ग्राहकांनी अधिकारी तक्रारींची दखल घेत नसल्यान आक्रमकपणे जाब विचारला.
वीज वितरणचे अधिकारी प्रश्न सोडवत नसतील, लोकांना वेठीस धरत असतील तर त्यांच्यावर निलंबनात्मक कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली. यावेळी कुडाळ कार्यकारी अभियंता विनोद विरप यांनी ग्राहकांचे प्रश्न मार्गी लावले जातील व समस्या सोडविल्या जातील अशी ग्वाही दिली. ग्रामिण भागातील महिलांनी देखील समस्यांकडे स्थानिक अधिकारी दखल घेत नसल्याची तक्रार केली. तर वाढीव शुल्काबाबत देखील जाब विचारण्यात आला.
यावेळी जिल्हा व्यापारी संघ अध्यक्ष प्रसाद पारकर, जिल्हा उपाध्यक्ष संजय भोगटे, कार्यकारी अभियंता विनोद विरप, नंदन वेंगुर्लेकर, श्रीपाद चोडणकर, ग्राहक पंचायत अध्यक्ष अनंत नाईक, तालुका व्यापारी संघाचे अध्यक्ष जगदीश मांजरेकर किरण सिध्दये, चित्तरंजन रेडकर, उप कार्यकारी अभियंता संदीप भुरे, धर्मराज मिसाळ, द्वारकानाथ घुर्ये, अनंत नाईक, एकनाथ गावडे, पुंडलिक दळवी, दिलीप भालेकर, देवेंद्र टेंमकर, सुरेश भुगटे, किशोर चिटणीस आदिंसह मोठ्या संख्येने व्यापारी संघाचे सदस्य व ग्राहक उपस्थित होते.