भुईबावडा घाटातील दरड हटवून मार्ग झाला खुला..!

Edited by: श्रीधर साळुंखे
Published on: September 27, 2023 19:25 PM
views 228  views

वैभववाडी : भुईबावडा घाटात पडलेली दरड हटविण्यात आली आहे. सायंकाळी ५.३० च्या दरम्यान घाट मार्ग वाहतुकीसाठी खुला झाला आहे. तालुक्यात गेल्या दोन दिवसांपासून जोरदार पाऊस कोसळत आहे.

याचा फटका भुईबावडा घाटाला बसला.सायंकाळी ४वा घाटात दरड कोसळली होती.त्यामुळे या घाटातील वाहतूक पुर्णतः ठप्प झाली होती. अखेर दिड तासाच्या प्रयत्नानंतर जेसीबीच्या साह्याने दरड हटवून मार्ग खुला करण्यात आला.आता या मार्गावर वाहतूक सुरळीत सुरू झाली आहे.