
सिंधुदुर्ग : विद्याभारती कोकण प्रांत, सिंधुदुर्ग शाखेच्या वतीने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त सप्तशक्तिसंगम कार्यक्रमाचे आयोजन, सावंतवाडी येथील वसंत शिशु वाटिकेत करण्यात आले या कार्यक्रमाला लाभलेल्या प्रमुख वक्त्या सौ भावना गवळी यांनी कीर्ती, धन, वाणी, स्मृती, धृती, मेधा क्षमा, या स्त्रीच्या अंगी असलेल्या सप्तशक्तींचे महत्त्व विशद केले.
या सप्तशक्तींच्या आधारानेच प्रत्येक स्त्री आपले कुटुंब, समाज, आपला देश आणि राष्ट्र सुसंस्कृत करण्याचा प्रयत्न करते, असे सांगितले. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या म्हणून लाभलेल्या सौ.स्नेहा लंगवे यांनी महिलांनी महिलांसाठी केलेल्या या कार्यक्रमाचे कौतुक केले. महिलांसाठी अत्यंत स्तुत्य उपक्रम आहे तसेच महिलांच्या अंगभूत असलेल्या सप्तशक्तींचा चा वापर करून त्यांनी समाजात स्वतःची ओळख निर्माण करावी असे मत व्यक्त केले.
या कार्यक्रमाची सुरुवात नवयुग का नव विचार आया या गीताने करण्यात आली. सिंधुताई सपकाळ, सुधा मूर्ती, गंगा नदी, गार्गी आणि सावित्रीबाई फुले अशा आपल्या प्रेरणास्थान असलेल्या वेशभूषा माता-पालकांनी सादर केल्या. या केलेल्या वेशभूषांनी कार्यक्रमाला फारच रंगत आली या वेशभूषेला अनुसरून डॉक्टर मेधा फणसळकर यांनी उपस्थित महिला वर्गाशी प्रश्न उत्तराने संवाद साधला. भारताच्या विकासात महिलांचे योगदान हा विषय मांडून आपली लहानात लहान कृती सुद्धा भारताच्या विकासासाठी कशी महत्त्वाची ठरते याची उदाहरणे देऊन सांगितले.
मान्यवरांचा परिचय आणि स्वागत सप्तशक्ती जिल्हा सहसंयोजिका योगिता कवठणकर यांनी केले. प्रास्ताविक डॉक्टर रश्मी कार्लेकर यांनी केले आणि सूत्रसंचालन सोनाली चुनेकर यांनी केले. या कार्यक्रमात आपल्या कार्याने उल्लेखनीय ठरलेल्या अशा तीन मातांचा सन्मान करण्यात आला.
सौ.सुनीती त्रंबक लेले, सौ.रोहिणी कृष्णाजी चव्हाण, आणि सौ. तृप्ती योगेश वारंग या तीन मातांना सन्मानपत्र पुस्तक व शेवंतीचे रोप भेट देऊन सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाला संगीत साथ हार्मोनियम वर कुमारी भावना सिद्धये व तबला कुमारी दुर्गा लोके यांनी केले. सिंधुदुर्ग सप्तशक्ती संगम च्या संयोजिका सौ धनश्री देउसकर यांनी आभार व्यक्त केले. कार्यक्रमाची सांगता सामूहिक संकल्प करून करण्यात आला.
या कार्यक्रमाला विद्याभारतीच्या स्वभावना गवळी सौ पल्लवी आपटे डॉक्टर मेहता फणसळकर केंद्रप्रमुख संस्नेहा लंगवे देउसकर सहसंयोजिका, योगिता कवठणकर, सौ मानसे वाटवे, सौ सिंधू लोके, सौ स्नेहा फणसळकर, सौ. उमा टिळवे, डॉक्टर रश्मी कार्लेकर शिशुवाटिकेच्या आचार्या श्रीमती विजया रामाणे आणि जवळजवळ शंभर माता उपस्थित होत्या.










