
कुडाळ : कुडाळ तालुक्यातील किनळोस येथील जीवन आनंद संस्था संचलित सक्षम आश्रममधून रविवार, दिनांक १४ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी ९ ते ९.३० या वेळेत एक ज्येष्ठ महिला कोणालाही काही न सांगता बेपत्ता झाली आहे. बेपत्ता झालेल्या महिलेचे नाव मंगल अशोक सुतार (वय ६८, रा. राधानगरी) असे आहे.
आश्रमाचे व्यवस्थापक महाबळेश्वर कामत (रा. पणदूर) यांनी सदर महिला आश्रमातून निघून गेल्याची खबर कुडाळ पोलीस ठाण्यात दिली आहे. त्यानुसार, कुडाळ पोलिसांनी मंगल अशोक सुतार यांच्या नापत्ता होण्याची नोंद केली आहे.
या घटनेबाबतचा पुढील तपास आवळेगाव पोलिस दुरक्षेत्राचे पो.हे.काॅ. तिवरेकर हे करीत आहेत.
आवाहन:
*जर कोणालाही मंगल अशोक सुतार यांच्याबाबत कोणतीही माहिती मिळाल्यास, त्यांनी त्वरित कुडाळ पोलीस ठाणे किंवा जवळच्या पोलीस दुरक्षेत्राशी संपर्क साधावा.










