
वैभववाडी : तणनाशक प्राशन केलेल्या सडुरे गावठणवाडी येथील अक्षय अशोक काटे (वय २५)या तरुणाचा आज (ता.१५)पहाटे चार वाजता उपचारादरम्यान मृत्यु झाला. शनिवारी त्याने तणनाशक प्राशन केले होते. तेव्हापासुन ओरोस जिल्हा रूग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू होते. अक्षय याने तणनाशक प्राशन करण्याचे कारण समजू शकले नाही.
सडुरे गावठणवाडी येथील अक्षय याने १३ डिसेंबरला दुपारी तीन वाजण्याच्या घरात असलेल बाटलीतील तणनाशक प्यायला. नातेवाईकांना ही माहीती मिळाल्यानतंर त्यांनी तातडीने त्याला वैभववाडी ग्रामीण रूग्णालयात उपचाराकरीता दाखल केले. तेथे प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी त्याला ओरोस येथील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. गेले तीन दिवस त्याच्यावर उपचार सुरू होते. परंतु आज पहाटे चार वाजण्याच्या सुमारास त्याचा मृत्यु झाला. याबाबतची खबर त्याचे चुलते संजय हरिश्चंद्र काटे यांनी वैभववाडी पोलीसांत दिली.
दरम्यान शवविच्छेदन करून दुपारी मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. त्यानंतर सायंकाळी त्याच्यावर सडुरे येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्याच्या पश्यात आई, चुलते असा परिवार आहे. तालुक्यात गेल्या महीनाभरात तणनाशक प्राशन करून आत्महत्या करण्याची ही पाचवी घटना आहे.










