शॉक लागलेल्या 'त्या' युवकाची प्रकृती गंभीर | न्याय न मिळाल्यास हेमंत वागळे यांचा आत्मदहनाचा इशारा

Edited by: विनायक गावस
Published on: September 13, 2023 17:08 PM
views 597  views

सावंतावडी : इन्सुली ग्रामपंचायत येथील स्ट्रीट लाईटच काम करीत असताना अमरदीप महेश कोठावळे, इन्सुली यांना विजेचा शॉक लागला. हा शॉक लागून ते पोलवरून खाली कोसळून अपघात झाला. सोमवारी ही घटना घडली होती. यानंतर त्यांना सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आल. सद्यस्थितीत त्यांची प्रकृती गंभीर असून गोवा बांबोळी येथे उपचार सुरु आहेत. प्रशासनान योग्य ती दखल घेतली नसल्याची तक्रार करत नातेवाईकांनी नाराजी व्यक्त केली आहे. दरम्यान, अनपेक्षित काही घडल्यास न्याय मिळेपर्यंत गप्प बसणार नाही. प्रसंगी ग्रामपंचायतसमोर आत्मदहन करणार असल्याचा इशारा सामाजिक कार्यकर्ते हेमंत वागळे यांनी दिलाय.