
वेंगुर्ला : सिधुदुर्ग जिल्ह्याचे जिल्हाधिकारी अनिल पाटील हे वेंगुर्ला येथे आले असता वेंगुर्ला तालुका भाजपा महिला मोर्चाच्या पदाधिका-यांनी त्यांची सदिच्छा भेट घेऊन त्यांचे स्वागत केले. यावेळी जिल्हाधिकारी यांच्या सोबत वेंगुर्ला तहसिलदार ओंकार ओतारी आणि जिल्हा नियोजन समितीचे सदस्य सचिन वालावलकर उपस्थित होते.
महिला मोर्चाच्या तालुकाध्यक्ष सुजाता पडवळ, जिल्हा उपाध्यक्ष अॅड.सुषमा प्रभूखानोलकर, वेंगुर्ला शहर अध्यक्ष मयेकर, तालुका सरचिटणीस आकांक्षा परब व प्रणाली खानोलकर, तालुका सदस्य स्मिता दामले, सुजाता देसाई, ईशा मोंडकर, हसिना मकानदार, रसिका मठकर व वृंदा मोर्डेकर यांनी जिल्हाधिकारी यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.