
महाबळेश्वर : डिजिटल इंडियाचे स्वप्न पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आहे. केंद्राकडून यावर नक्कीच ठोस निर्णय होईल. मात्र, सध्यस्थितीत राज्य सरकारच्या वतीने आम्ही डिजिटल मिडीयाचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न केले जातील. सरकारच्या वतीने जसे प्रिंट मिडीयाचे नियम, अटी आहेत. तशा डिजिटल मीडिया सुद्धा सरकारच्या वतीने त्या पत्रकारांना न्याय मिळवून दिला पाहिजे. ही इलेक्ट्रॉनिक क्रांती आहे. सध्या डिजिटल मीडियाचे युग आहे. राज्य सरकारचे निर्णय सुद्धा एका क्षणात डिजिटल मीडियादवारे सर्वत्र पसरतात. त्यामुळे डिजिटल मिडीयाचे प्रश्न मुख्यमंत्री लवकरच मार्गी लावतील. झटपट निर्णय घेणे ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ख्याती आहे. त्यामुळे डिजिटल मिडीयाच्या पत्रकारांना लवकरच न्याय मिळेल. असा विश्वास शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी व्यक्त केला.
डिजिटल मिडिया संपादक, पत्रकार संघटनेचे पहिले राज्यस्तरीय अधिवेशन महाबळेश्वर येथे सुरु आहे. या अधिवेशनात मंत्री केसरकर बोलत होते. यावेळी बोलताना श्री केसरकर म्हणाले, डिजिटल मिडीयाची सुरुवात कमी खर्चात होते. अनेकांनी छोटे छोटे स्टुडिओ स्थापन केले आहे. पण डिजिटल मीडिया ह्या शास्त्राचा योग्य वापर झाला पाहिजे. या मीडियामुळे एखाद्याचा फायदा सुद्धा होईल आणि एखाद्याचे आयुष्य सुद्धा उध्वस्थ होऊ शकते. त्यामुळे शोध पत्रकारिता आणि बातमीची पडताळणी करून बातम्या फ्लॅश करणे आवश्यक असल्याचे दीपक केसरकर यांनी सांगितले.