बदलाची सुरुवात शिवमूर्तीच्या स्थापनेतून

संदिप गावडेंचा पुढाकार ; शिरशिंगेत भूमिपूजन
Edited by: विनायक गांवस
Published on: April 26, 2024 08:23 AM
views 245  views

सावंतवाडी : भाजपचे माजी तालुकाध्यक्ष तथा पंचायत समिती सदस्य संदिप गावडे आणि शिरशिंगे मळईवाडी ग्रामस्थ यांनी एकत्र येत शिवमूर्तीचे भूमिपूजन केले.  ऐतिहासिक किल्ले मनोहर-मनसंतोषगडच्या पायथ्याशी शिरशिंगे मळईवाडी ग्रामस्थ, युवक व महिला वर्गाच्या उत्स्फूर्त मागणीला प्रतिसाद देत संदिप गावडे यांच्या माध्यमातून शिरशिंगे मळईवाडी येथे लवकरच शिवमूर्तीची स्थापना करण्यात येणार आहे. काही दिवसापूर्वी गावभेट कार्यक्रमा दरम्यान संदिप गावडे यांनी शिरशिंगे मळईवाडी येथे भेट दिली असता वाडीवरील विविध समस्या व व्यथा ग्रामस्थांनी मांडल्या होत्या.

त्यावेळी सर्वांनी एकत्र येत बदल घडवूया असे मत संदिप गावडे यांनी मांडले होते. आज त्याच बदलाची सुरुवात शिवमूर्तीच्या स्थापनेतून सर्वांनी एकत्र येत केली आहे. या कार्यक्रमावेळी शिरशिंगे मळईवाडी भाजपा बूथ अध्यक्ष अमित राऊळ, मा.ग्रा.पं सदस्य संदिप राऊळ, सुरेश राऊळ व मोठ्या प्रमाणात शिरशिंगे ग्रामस्थ, युवक व महिला वर्ग उपस्थित होता.