नियंत्रण सुटलं आणि गाडी संरक्षक भिंतीला ठोकली

Edited by: विनायक गावस
Published on: November 23, 2023 10:32 AM
views 639  views

सावंतवाडी : चालकाचे नियंत्रण सुटल्याने बाजुला असलेल्या संरक्षक भिंतीला गाडी ठोकल्याने  झालेल्या अपघातात ४०७ टेम्पोचे मोठे नुकसान झाले आहे. हा अपघात काल रात्रीच्या सुमारास येथील सालईवाडा धान्य गोदामाच्या परिसरात घडला आहे. सुदैवाने यात कोणालाही दुखापत झाली नसली तरी टेम्पोचे मात्र मोठे नुकसान झाले आहे.