
सावंतवाडी : गाडीवरील ताबा सुटल्याने मारुती सुझुकी एस क्रॉस गाडी लाईटच्या खांबाला आदळली. हा अपघात माडखोल परिसरात काल रात्री १ वाजण्याच्या सुमारास घडला.
सुदैवाने या अपघातात कारचालकाला किरकोळ दुखापत झाली असून कारचे मात्र मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. दरम्यान, ग्रामस्थांनी कारचालकाला अधिक उपचारासाठी सावंतवाडी रुग्णालयात हलविले.