
संगमेश्वर : चिपळूण संगमेश्वर मतदार संघाचे आमदार शेखर निकम यांनी तालुक्यातील निवधे गावासाठी CRF योजने अंतर्गत पुलासाठी ४ कोटी ३२ लाख निधी खर्चून हा पुल अखेर पुर्ण केला असून ग्रामस्थांकडून समाधान व्यक्त होताना दिसत आहे.
निवधे गाव कित्येक वर्षे अपुऱ्या पुलाच्या सुविधांमुळेे तिथल्या ग्रामस्थांना पावसाळ्यात फार मोठ्या समस्येला सामोरे जावे लागत असता त्याच मागणीचा वारंवार पाठपुरावा करत आमदार शेखर निकम यांचे विश्वासू रविंद्र गुरव यांनी ह्या पुलासाठी आमदार शेखर निकम यांच्या कडून निधी मंजूर करुन हे काम पुर्णत्वास नेले.