कणकवली जानवली जोडणारा पूल विकासाचा दुवा ठरेल : नितेश राणे

Edited by:
Published on: March 08, 2024 13:55 PM
views 391  views

कणकवली : जेव्हा कणकवलीकरांनी आम्हाला सत्ता देताना नगराध्यक्ष म्हणून समीर नलावडे यांना निवडून दिल होतं. तत्पूर्वी प्रचार करताना केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी कणकवलीची सत्ता द्या … आम्ही कणकवलीचा चेहरा मोहरा बदलून दाखवू.असे सांगितले होते.  त्याच पध्दतीने आम्ही गेली ५ वर्षे व आमचे सर्वच लोकप्रतिनीधी व सर्वच सहका-यांनी एकत्र मिळून ही विविध  विकास कामे कणकवलीमध्ये केलेली आहेत. आता ज्या पुलाचे आम्ही भूमीपूजन पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्या हस्ते केले आहे. तो आमचा एक अतिशय महत्वकांक्षी प्रकल्प होता. आमच्या पाठपुराव्याला मोठे यश आले आहे. आता कणकवली शहर  आणि ग्रामीण भाग जोडला जाईल. हा पुल विकासाचा दुवा ठरेल अशी प्रतिक्रिया भाजपा आ. नितेश राणे यांनी दिली.  


कणकवली आणि जानवली जोडणाऱ्या पुलाच्या कामाचे भूमिपूजन पालकमंत्री रविंद्र चव्हाण,आ.नितेश राणे,माजी आ.प्रमोद जठार यांच्या हस्ते पार पडले. यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता छाया नाईक, माजी आमदार प्रमोद जठार, भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, प्रांताधिकारी जगदीश कातकर, तहसीलदार दीक्षांत देशपांडे, राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अबिद नाईक, विलास गावकर, कणकवली कार्यकारी अभियंता अजयकुमार सर्वगोड , सावंतवाडी कार्यकारी अभियंता महेंद्र कीणी,उपविभागीय अभियंता कमलिनी प्रभू, उपअभियंता विनायक जोशी, श्री.बासुतकर, भाजप युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष संदीप मेस्त्री, भाजपा तालुका अध्यक्ष मिलिंद मेस्त्री, कणकवली माजी नगराध्यक्ष समीर नलावडे, माजी उपनगराध्यक्ष बंडू हर्णे, महेश सावंत, माजी नगरसेविका मेघा गांगण, सुप्रिया नलावडे,मेघा सावंत, कविता राणे,संजय कामतेकर,अभिजित मुसळे, किशोर राणे, अभय राणे, व्यंकटेश सावंत, संदीप सावंत,रंजन राणे ,जानवली सरपंच अजित पवार,बबलू सावंत, भाई आंबेरकर, परशुराम झगडे  आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.


आ. नितेश राणे म्हणाले , या पुलामुळे  कणकवली मध्ये वाहतूक कोंडी कमी होईल. तसेच  जानवली व लगतच्या ग्रामीण भागातील नागरिकांसाठी दळणवळणासाठी सोयीचे ठरेल. या दृष्टीकोनातून आपला प्रयत्न होता. पालकमंत्र्यांनी  आमच्या या पुर्ण संकल्पनेला ख-याअर्थाने सत्यात उतरवण्यात आम्हाला फार मोठी ताकद दिली. सार्वजनिक बांधकामचे श्री. सर्वगोड व अन्य सहका-यांनी सगळ्याच पाठपुराव्या मध्ये आम्हाला मदत केली. आणि आज या पुलाचं भुमिपुजन झालेलं आहे. जवळजवळ 8 कोटीचं हे पुल असणार आहे. 

या पुलाचे काम 15 जुन पर्यंत पुर्ण होईल. जसे पंतप्रधान मोदी बोलतात की, भूमिपूजन पण आम्ही करतो आणि उद्घाटन पण आम्हीच करतो. तोच धागा धरुन या प्रकल्पाचे भुमिपुजन आम्ही केलेलं आहे.  आणि येणा-या जुन महिन्यामध्ये उद्घाटन आम्हीच करणार आहोत.  कणकवलीचा विकसित चेहरा पुर्ण ओळख म्हणून आम्ही पुर्ण देशासमोर आणणार आहोत. 

शेवटी प्रशासकीय राजवट असेल परंतु विकासाची मानसिकता महत्वाची आहे. कोण सत्तेमध्ये आहे हे फार महत्वाचे आहे . सत्ता असो किंवा नसो त्याचा वापर तुम्ही कसा करता हे महत्वाचे आहे. आज आमची सत्ता नसली तरी कणकवलीकरांसाठी ३६५ दिवस आणि २४ तास सेवेत मी व माझे सहकारी समीर नलावडे , अबिद नाईक , बंडु हर्णे व सर्वच जण आहोत.