
कणकवली : कणकवली समर्थ नगर येथे सकाळी 9 च्या सुमारास खासगी विहिरीमध्ये अनोळखी इसमाचा मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली आहे.
त्या मृतदेहाच्या अंगावर निळ्या कलरचा टी-शर्ट, हाफ पॅन्ट होती साधारणतः त्याचे वय 45 च्या सुमारास असण्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. हा मृतदेह विहिरीमधून नगरपंचायत प्रशासनाने बाहेर काढला असून अधिक तपास कणकवली पोलीस करत आहेत.