
दोडामार्ग : मणेरी येथील तिलारी नदीपात्रात संतोष तळवडेकर या युवकाची मृत देह सोमवारी आढळून आला. मुसळधार पाऊस व तिलारी नदीला आलेल्या पुरात तो युवक वाहून गेल्याचा अंदाज येथील नागरिकांनी व्यक्त केला आहे.
या बाबत अधिक माहिती अशी की चार दिवसांपूर्वी मणेरी येथील संतोष तळवडेकर हा युवक बेपत्ता होता. हा युवक माशे विकण्याचा छोटासा व्यवसाय करून आपला उदरनिर्वाह करत होता. मात्र गेल्या 3 ते 4 दिवस पडलेल्या पावसामुळे तिलारी नदीपात्रात पाण्याची मोठी वाढ झाली होती. आणि हा युवक मणेरी येथील नदी पात्रा कडे कामा निमित्त गेला होता व त्याठीकाणी तो घोळ येऊन पाण्यात पडला असावा व पाण्याच्या प्रवाहात वाहून त्याचा मृत्यू झाला असावा असा अंदाज येथील ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे. सोमवारी येथील काही ग्रामस्थ नदीकाठी आपल्या शेतीत गेले असता त्यांना नदी पात्रातील बांधऱ्याला युवक अडकल्याचे निदर्शनास आले. ही बाब त्यांनी गावांत सांगितली त्यावेळी ग्रामस्थांनी त्याला बाहेर काढले.