मराठ्यांच्या रक्ताची किंमत मोजावी लागेल !

मराठा पेटून उठेल : सिताराम गावडे
Edited by: विनायक गावस
Published on: September 05, 2023 16:34 PM
views 212  views

सावंतवाडी : मराठा बांधवांचे जे नाहक रक्त पोलीस प्रशासनाने सांडवलं आहे त्याचा हिशोब सरकारला द्यावाच लागेल. सांडलेल्या रक्ताची जबर किंमत शासनाला मोजावी लागेल असा इशारा मराठा समाजाचे तालुकाध्यक्ष सिताराम गावडे यांनी सावंतवाडी तहसीलदार यांना समाजाच्यावतीने निवेदन देताना शासनाला दिला आहे. दरम्यान आता मराठा बांधव हा गप्प बसणार नाही तर अजून पेटून उठणार असे ते यावेळी म्हणाले. सावंतवाडी मराठा समाजाच्या वतीने जालना जिल्ह्यातील अंबड सराटी अतंरशाली गावात मराठा समाज बांधवांवर झालेल्या लाठी हल्ल्याच्या निषेधार्य तहसीलदारांना निवेदन सादर केले. यावेळी उपस्थित मराठा बांधवांना संबोधित करताना ते बोलत होते.

यावेळी मराठा समाजाचे सल्लागार विकास सावंत म्हणाले,‌ आता मराठा समाजाला कोणत्याही राजकीय पक्षावर विश्वास राहिलेला नाही. पक्षाने फक्त स्वतःच्या स्वार्थासाठी मराठा समाजाचा उपयोग करून घेतला त्यामुळे आता ही लढाई प्रत्येक मराठ्यांनी स्वतःची वैयक्तिक लढाई आहे असे समजून लढली पाहिजे तरच आपण विजय संपादन करू शकतो असे सांगून जालन्यामध्ये झालेल्या लाठी चार्ज हा सरकार पुरस्कृत असल्याचा आरोप केला.   

अर्चना घारे परब यांनी जिजाऊंच्या लेकिनवर झालेला हल्ला अतिशय निंदनीय आहे. मराठा समाज कधीच विसरू शकत नाही अबाल वृद्धांवर दाखल केलेले  गुन्हे व सनदशीर मार्गाने चाललेले उपोषणाला गालबोट लावण्याचे केलेले काम कधीच विसरणार नाही असे सांगून याचा शासनाला जाब द्यावा लागेल असा इशारा दिला.

सावंतवाडी मराठा समाजाच्या वतीने येथील नायब तहसीलदार संदीप सावंत यांना निवेदन सादर केले. दरम्यान यावेळी जोरदार घोषणाबाजी देण्यात आल्या.यावेळी विकास सावंत, लक्ष्मण नाईक,अर्चना घारे परब, बाळा गावडे, बाबू कुडतरकर सुधीर राऊळ, अपर्णा कोठावळे, प्रशांत कोठावळे, पुडलिंक दळवी, जिवन लाड, सचिन बिरोडकर, एकनाथ गावडे,विनिश तावडे,गोविंद सावंत,आनंद सावंत, अब्जू सावंत,राजन सावंत, तानाजी पाटील,विलास जाधव,संदिप गवस, शिवदत्त घोगळे, चंद्रकांत राणे,राजू तावडे,सुधीर राऊळ,उमाकांत वारंग,विकास सावंत, लक्ष्मण नाईक,अर्चना घारे परब, बाळा गावडे, बाबू कुडतरकर सुधीर राऊळ, अपर्णा कोठावळे, प्रशांत कोठावळे, पुढलिंक दळवी, जिवन लाड, सचिन बिरोडकर, एकनाथ गावडे,विनिश तावडे,गोविंद सावंत,आनंद सावंत, राजू तावडे,सुधीर राऊळ,उमाकांत वारंग आदी मराठा बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.