
सावंतवाडी : ब्रेक न लागल्याने महिलेच दुचाकीवरच नियंत्रण सुटून शहरात अपघात घडला. ब्रेक न लागल्याने थेट ही दुचाकी दुकानात घुसून अपघातग्रस्त झाली. गवळी तिठा परिसरात आज सकाळी ही घटना घडली. यात सुदैवाने कुणालाही दुखापत झाली नाही. यात ऐन गणेश चतुर्थीच्या तोंडावर भाजपचे पदाधिकारी दिलीप भालेकर यांच्या दुकानाचे मात्र मोठे नुकसान झाल आहे.