दुचाकीची एसटीला धडक ; एकजण जखमी

Edited by: श्रीधर साळुंखे
Published on: February 12, 2025 13:11 PM
views 677  views

वैभववाडी : करुळ चेकपोस्टनजीक दुचाकी व एसटीची धडक होऊन करुळ खडकवाडी येथील विश्वनाथ सावंत, वय ५६ हे गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात आज सकाळी झाला. जखमीवर वैभववाडी ग्रामीण रुग्णालयात उपचार करून अधिक उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.