
कणकवली : वक्त आने दो ...जबाब भी देंगे और हिसाब भी लेंगे अशा आशयाचा कणकवलीत लागला बॅनर. बॅनरवर उदय सामंत आणि किरण सामंत यांचा फोटो. कणकवली शिवसेना शाखेबाहेर लागलेला हा बॅनर नेमका कोणाला इशारा देण्यासाठी ? याबाबत उलट सुलट चर्चा रंगल्यात.
लोकसभा निवडणूक झाल्यानंतर भाजप आणि शिंदे गटात कुरबुरी सुरू झाली होती. सामंत बंधुंवर आरोप ही झाले होते. त्यातूनच हा बॅनर लावून राणेंना इशारा देण्याचा प्रयत्न असल्याची ही चर्चा. संपूर्ण जिल्ह्यात या बॅनरची चर्चा सुरु आहे.