'येड्यांच्या जत्रे 'मुळे बिघडलेलं वातावरण महासंस्कृती महोत्सवामुळे बदललं

नितेश राणेंचा ठाकरेंना टोला
Edited by: विनायक गावस
Published on: February 06, 2024 14:25 PM
views 246  views

सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्ह्याला महोत्सवांची परंपरा आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी पर्यटन महोत्सवाच्या माध्यमातून अनेक मोठ मोठे कलाकार या जिल्ह्यात आणले. त्याला जनतेने नेहमीच उदंड प्रतिसाद दिला होता. मात्र, अलिकडे काही दिवसांत जिल्ह्यात व कोकणात

'येड्यांची जत्रा ' सुरु होती. या येड्यांच्या जत्रेला प्रतिसाद न मिळाल्याने आमच्याच पंतप्रधानांनी सुरु केलेल्या वंदे भारत एक्सप्रेसने ते परत निघून गेले. त्या जत्रेमुळे जिल्ह्यातील बिघडलेले वातावरण या सिंधुदुर्ग महासंस्कृती महोत्सवामुळे निवळेल व या महोत्सवाला सिंधुदूर्ग जिल्हावासीय उस्फूर्त प्रतिसाद देतील असा विश्वास आ. नितेश राणे यांनी व्यक्त केला.सावंतवाडी जिमखाना मैदानावर  पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग महाराष्ट्र राज्य व जिल्हा प्रशासन सिंधुदुर्ग आयोजित सिंधुदुर्ग महासंस्कृती महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. 

ते म्हणाले, जिल्हा प्रशासनाने सावंतवाडी शहरात आयोजित केलेला हा महोत्सव निश्चितच अभिनंदनीय आहे. या महोत्सवाच्या माध्यमातून जिल्हावासीयांना विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी उपलब्ध झाली आहे. जिल्हा प्रशासनाला या महोत्सवाला प्रतिसाद मिळेल की नाही याची चिंता होती. मात्र, त्यांनी त्याची काळजी करू नये. कारण कार्यक्रम सुरु झाल्यानंतर मैदानावर जागा पुरणार नाही. याचा अनुभव यापूर्वी आम्ही घेतला आहे असेही त्यांनी स्पष्ट केले.