भटवाडीत दुर्गामातेचे वाजत गाजत आगमन

Edited by: विनायक गांवस
Published on: September 30, 2024 14:24 PM
views 237  views

सावंतवाडी : ओंकार नवरात्रोत्सव मित्रमंडळ भटवाडी येथे दुर्गामातेचे वाजत गाजत आगमन करण्यात आले. घटस्थापनेनंतर पुढील नऊ दिवस मोठ्या उत्साहात नवरात्रोत्सव साजरा करण्यात येणार आहे. भटवाडी येथील नवदुर्गेच सोमवारी वाजत गाजत आगमन करण्यात आले.या मिरवणुकीला मंडळाचे सल्लागार बबन साळगावकर, दिलीप भालेकर, अध्यक्ष दीपक सावंत, भरत परब, कुणाल शृंगारे, संतोष खंदारे, विजय सावंत, राजा दळवी, शिवम सावंत, प्रदीप भालेकर, प्रसाद परब आदी मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.