
सावंतवाडी : तीन डिसेंबरचा गुलाल हा भाजपचाच असणार आहे. सावंतवाडीची सभा ही शहरं विकासाच्या महासंकल्पाची आहे असं मत भाजप युवा नेते विशाल परब यांनी व्यक्त केले.
नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार युवराज्ञी श्रद्धाराजे भोंसले निवडणूक रिंगणात आहेत. आमच्या भाजपच्या सैनिकांनी त्यांच्या प्रचारासाठी शहर पिंजून काढलं आहे. शहराचा कायापालट फक्त भाजप करू शकते. देशात मोदी, राज्यात देवेंद्र फडणवीस व जिल्ह्यात रविंद्र चव्हाण, पालकमंत्री नितेश राणे आहेत. त्यामुळे भाजपच्या नगराध्यक्षांसह नगरसेवकांना मोठ्या मताधिक्याने निवडून द्या असे आवाहन त्यांनी केले.










