
सावंतवाडी : कॅथॉलिक अर्बन को. ऑप. क्रेडीट सोसा. लि., सावंतवाडी या संस्थेची 31 वी सर्वसाधारण सभा रविवारी नवसरणी केंद्र, सावंतवाडी येथे संपन्न झाली. संस्थेला निव्वळ नफा 3 कोटी 3 लाख झाला असून सभासदांना 14% लाभांश जाहीर करण्यात आला असून सभा चालू असतानाच लाभांश सभासदांच्या खात्यावर जमा करण्यात आल्याची माहिती संस्थेकडून देण्यात आली आहे.
या सभेला प्रमुख पाहुणे म्हणून मिलाग्रीस चर्च सावंतवाडीचे पॅरिश प्रिस्ट फा. मिलेट डिसोजा उपस्थित होते. तसेच मदर तेरेसा स्कूल वेंगुल्याचे मुख्याध्यापक फा. फॅलिक्स लोबो, रोजरी इंग्लिश स्कुल मालवणचे मुख्याध्यापक फा. ऑल्वीन गोन्साल्विस, मिलाग्रीस हायस्कूल सावंतवाडीचे मुख्याध्यापक फा. रिचर्ड सालदाना, सावंतवाडीचे फा. फिलिप डिसोजा व सेंट फ्रान्सिस झेवियर चर्च आजगांवचे पॅरिश प्रिस्ट फा. इलियास रॉड्रीक्स आदी उपस्थित होते. सभेच्या सुरूवातीला फादर मिलेट यांनी प्रार्थना केली. त्यानंतर दरवर्षी प्रमाणे सभासदांच्या पाल्यांचा शैक्षणिक तसेच क्रिडा क्षेत्रात विशेष प्राविण्य संपादन केल्याबद्दल सत्कार करण्यात आला. सन 2024-2025 या आर्थिक वर्षांत संस्थेला वेगवेगळ्या स्तरावर तीन पुरस्कार प्राप्त झाले आहेत. संस्थेने स्थापनेपासूनची ऑडिट वर्ग "अ" ची परंपरा कायम राखली आहे. 31 मार्च 2025 अखेर संस्थेने 250 कोटी ठेवींचा टप्पा पार केला आहे. सातत्यपुर्ण कर्ज वसुली, 3 कोटी 03 लाख निव्वळ नफा, 40% घरात असलेली संस्थेची गुंतवणूक, 188 कोटी कर्ज तसेच संस्थेला आदर्श ठरावी व अभिमान वाटावा अशी सर्व आदर्श प्रमाण संस्थेने राखली आहेत, अशी माहिती संस्थेच्या अध्यक्षा श्रीम. आनमारी डिसोजा यांनी दिली. चालू वर्षी देखील सभासदांना 14 टक्के लाभांश जाहीर करण्यात आला व सभा चालू असतानाच लाभांश सभासदांच्या खात्यावर जमा करण्यात आला. त्यानंतर फा. मिलेट डिसोजा यांनी आपले मनोगत व्यक्त करून संस्थेच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. तसेच फा. फॅलिक्स लोबो यांनी कर्मचारी वर्गाचे कौतुक केले व संस्थेच्या भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. सभेचे सर्व विषय अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात मंजूर करण्यात आले. इतिवृत्त वाचन सेक्रेटरी. मार्टीन आल्मेडा तर अहवाल वाचन सरव्यवस्थापक जेम्स बॉर्जिस यांनी केले. संस्थेच्या वाढीसाठी सभासदांचे व कर्मचाऱ्यांचे अध्यक्षा आनमारी डिसोजा यांनी आभार मानले. आभार प्रदर्शन संस्थेचे संचालक जॉय डॉन्टस यांनी केले. तर सभेचे सुत्रसंचालन फॅन्की डॉन्टस यांनी केले