
वैभववाडी : कुसूर येथे सापडलेल्या त्या प्लॅस्टिक सदृश तांदळाबाबत महसूल विभागाने स्पष्टीकरण दिले आहे.तो तांदूळ प्लॅस्टीकचा नसून पौष्टिक तांदूळ आहे, अस पुरवठा अधिकारी रामेश्वर दांडगे यांनी सांगितले.
तालुक्यातील कुसूर येथे रास्त धान्य दुकानावरून वितरित करण्यात आलेले तांदूळ प्लॅस्टीकचा असल्याचे निदर्शनास आले. यावरून तालुक्यात खळबळ उडाली होती. अखेर या संदर्भात पुरवठा विभागाने यांची खातरजमा केली आहे. रास्त धान्य दुकानातून वितरीत झालेला तांदूळ प्लॅस्टीकचा नसून तो पोर्टी फाईड तांदूळ आहे. हा पौष्टिक तांदूळ आहे. नागरिकांनी घाबरून जाऊ नये असे आवाहन पुरवठा विभागाने केले आहे.