
वैभववाडी : तळेरे - कोल्हापुर राष्ट्रीय महामार्गावरील वैभववाडी शहरातील राजापूर अर्बन बँकेच्या समोर रस्त्यावरील पडलेला खड्डा अपघातास कारणीभूत ठरत आहे.संबधित विभागाकडून त्याची दुरुस्ती होत नसल्याने वाहनचालकांकडून नाराजी व्यक्त होत आहे. तळेरे - कोल्हापुर राष्ट्रीय महामार्गावर वैभववाडी येथे रस्त्याच्या मधोमध खड्डा पडला. याच खड्यात काही महीन्यापुर्वी दुचाकीवरून एक महीला पडून गंभीर झाली होती.त्यानंतर सामाजिक कार्यकर्त्यांनी मातीने हा खड्डा बुजवला होता.वाहनांच्या रहदारीमुळे पुन्हा त्याच ठिकाणी खड्डा पडला आहे.दोन्ही बाजूंनी रस्ता गुळगुळीत असल्याने वाहनचालक वेगाने या मार्गावरून ये जा करीत असतात.मात्र अनेक वाहनचालकांच्या हा खड्डा लक्षात येत नसल्याने वाहने खड्यात येऊन आपटतात.या खड्यामुळे मोठा अपघातात होण्याचीही शक्यता अधिक आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभागाने हा खड्डा तात्काळ बुजवावा अशी मागणी होत आहे.